आशाताई बच्छाव
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग
अज्ञात वाहन चालक मालका विरुद्ध गुन्हा दाखल. . मयुर खापरे चांदुर बाजार तालुका प्रतिनिधी
अवैध गौणखनीज कारवायामध्ये अमरावती जिल्ह्यात चांदुरबाजार तालुका कायम आघाडीवर राहिला आहे. तहसीलदार गीतांजली गरड यांनी कार्यभार घेतल्यानंतर या कारवायामध्ये लक्षणीय वाढ झाली आहेच शिवाय अवैध वाळू जप्त करून ती घरकुल धरकांना मोफत वाटप करण्यातही अव्वल कामगिरी झाली आहे. यामध्येच आज दिनांक3/3/ 2024 रोजी पहाटे 3.45 वाजनेच्या सुमारास तहसीलदार गीतांजली गरड स्वतः पथकासमवेत कारवाई साठी गेल्या असता एक रेतीने भरलेल्या ट्रक ला अडवून त्याला थांबवण्यासाठी सांगितले असतानाही सदर ट्रक चालकाने गाडी उजव्या बाजूला घेऊन वेगाने पळ काढला. तरीही तहसीलदार आणि पथकाच्या गाडीने तब्बल पंधरा किलोमीटर पर्यंत गाडीचा थरारक पणे पाठलाग केला.परंतु ट्रक चालकाने वेगाने गाडी पळवून लावत पळ काढला. आज सदर चालक आणि मालक यांचेविरुद्ध चांदुरबाजार po st मध्ये गुन्हा नोंद करणेत आला आहे. ट्रकवर नंबर नसल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आला आहे. त्यानंतर हि पथकाने बहिरम पोस्ट जवळ वाहन तपासणी केली. रात्री 2.30 पासून सदर पथक तालुक्यामध्ये सर्वत्र वाळूविरोधी कारवाईकरिता गस्त घालत होते. यामुळे तालुक्यातील वाळूमाफीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यवाहीमध्ये स्वतः तहसीलदार गीतांजली गरड
मंडळ अधिकारी गजानन दाते तलाठी संकेत घोरपडे यांचे सह वाहन चालक नंदू पावडे तसेच कोतवाल प्रफुल्ल भाकरे. सौरभ चौधरी तसेच शिपाई थोरात सहभागी होते






