आशाताई बच्छाव
मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांची चौकशी करुन
निलंबित करा – माजी आमदार संतोष सांबरे यांचे गृहमंत्री व पोलीस
अधिक्षकांना निवेदन
जालना, दि. २४(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-बदनापूर येथे मराठा समाज आंदोलकांवर लाठीहल्ला
करणार्या पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना निलंबित करून प्रकरणाची
चौकशी करावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार संतोष सांबरे यांनी गृहमंत्री
व पोलीस अधीक्षक जालना यांना दिले आहे.
गृहमंत्री व पोलीस अधिक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनात सांबरे यांनी
म्हटले आहे की,बदनापूर तालुक्यातील मौजे धोपटेश्वर येथे मराठा आंदोलनाचे
प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा समाजाच्या
वतीने २४ फेब्रुवारी रोजी रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. या
रास्ता रोकोची पुर्वकल्पनाही पोलिस निरिक्षक, पोलीस ठाणे बदनापूर यांना
दिलेली होती. रास्ता रोको आंदोलन हे संवैधानिक व अत्यंत शांततेच्या
मार्गाने सुरु असतांना अचानकपणे बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक
सुदाम भागवत यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
पोलिस निरिक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकार्यांनी या रास्ता रोको
आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असणार्या युवक, महिला व लहान मुलांवर
अमानुषपणे लाठी हल्ला केला असुन यामध्ये अनेक युवक, महिला व लहान मुले
जखमी झालेले आहे. शांततेच्या व संवैधानिक मार्गाने सुरु असलेल्या रास्ता
रोको आंदोलनाप्रसंगी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केल्याप्रकरणी पोलिस
निरिक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकार्यांना निलंबीत करुन या
प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गृहमंत्री व पोलीस अधिक्षकांकडे
माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली आहे.