Home जळगाव खासदार सांस्कृतिक महोत्सवातून चाळीसगावकरांना केला छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर

खासदार सांस्कृतिक महोत्सवातून चाळीसगावकरांना केला छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर

102

आशाताई बच्छाव

IMG_20240224_080521.jpg

खासदार सांस्कृतिक महोत्सवातून चाळीसगावकरांना केला छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर
——————————————
रयतेचा राजा महानाट्य,महिलाचे शिवकालीन खेळ, ढोलपथक सादरीकरण, महाआरतीतून शिवप्रेमिंचा जल्लोष
—————————————–
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- खासदार सांस्कृतिक महोत्सवातून विविध कार्यक्रमातून चाळीसगावकरांसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला. खासदार उन्मेशदादा पाटील व सौ.संपदाताई पाटील यांच्या माध्यमातुन *रयतेचा राजा महानाट्य, महिलाचे शिवकालीन खेळ, ढोलपथक सादरीकरण,महाआरतीतून शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते.
चाळीसगाव येथे खासदार उन्मेशदादा पाटील, संपदाताई पाटील यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला शहरातील हेमंत जोशी क्रीडांगणावर राजा रयतेचा हे भव्य दिव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे माजी संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाषजी भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, खासदार उन्मेशदादा पाटील, सौ.संपदाताई पाटील, प्रदेश किसान मोर्चाचे पोपटतात्या भोळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.
उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी प्रास्तविक केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणाऱ्या व्यक्तींचा,संस्था, प्रतिष्ठान,शिवप्रेमी संघटनांचा शिव रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.शिवचरित्राचा जागर करीत आणि वर्षभर शिवरायांच्या विचारांवर काम करणाऱ्या मिञ मंडळ,संघटनाचा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
शिव अभ्यासक दादा नेवे लिखित, हास्य जत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील दिग्दर्शित राजा रयतेचा या महानाट्यातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. शहीद हेमंत जोशी पटांगणावर या कार्यक्रमास शहर तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. फटाक्यांच्या आतषबाजीने शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला.
याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र,आचार,विचार हे कृतीत आणण्याची गरज आहे. याच विचाराने खासदार सांस्कृतिक महोत्सवातून आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक विविध कार्यक्रमाची मेजवानी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिलो आहे. चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष आपल्यासमोर असून आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या घटनेचा आम्हाला सर्वांना आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उमंग सृष्टी परिवाराच्या संपदाताई पाटील यांनी उपस्थित शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्यात. त्या म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या युद्ध कलेवर आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केले. ही युद्ध कला पुरुषांप्रमाणे महिलांनी देखील आत्मसात केली होती.रणांगण गाजवणाऱ्या शुर माता, माता जिजाऊ माँ साहेब, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा यासारख्या शूर महिलांनी मैदान गावातून स्वराज्याचे रक्षण केलं. ही युद्ध कला हे शिवकालीन खेळाची कला आजच्या माझ्या शिवकन्या माता भगिनी यांनी आत्म संरक्षणासाठी आत्मसात करुन डिजिटल युगात आमच्या शिवकन्यांनी मराठमोळ्या परंपरा व सर्व संस्कृती रक्षण करण्याचा जो प्रयत्न केला आहे.याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते असे म्हणाल्या.

Previous articleबनावट वेबसाईटमुळे चाळीसगावचे इसमाचे बँक खाते रिकामे होण्यापासून वाचले
Next articleकथा – स्नेहबंध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.