Home जालना जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी कारवाई करा – विभागीय...

जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी कारवाई करा – विभागीय आयुक्त यांना माजी आमदार सांबरे यांच्यासह ठेवीदारांचे निवेदन

82

आशाताई बच्छाव

IMG_20240224_073830.jpg

जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून
देण्यासाठी कारवाई करा – विभागीय आयुक्त यांना
माजी आमदार सांबरे यांच्यासह ठेवीदारांचे निवेदन
माजी आमदार सांबरे यांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट
जालना, दि. २४(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह
क्रेडीट सोसायटीच्या जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व
ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही  करण्यात यावी, या
मागणीचे निवेदन संभाजीनगर विभागीय आयुक्तांना माजी आमदार संतोष सांबरे
यांच्या उपस्थितीत संबंधीत ठेवीदारांनी दिले आहे. यावेळी सांबरे यांनी
आयुक्त यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. या
बँकेच्या राज्यभरात एकुण ५२ शाखा आहेत. या शाखांमध्ये ठेवीदारांनी जवळपास
६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी ठेवलेल्या आहे. हे सर्व ठेवीदार हे
शेतकरी, कष्टकरी, मजुर, छोटे व्यापारी आणि काही सेवानिवृत्त कर्मचारी
असुन या सर्व ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी सदरील बँकेमंध्ये
ठेवल्या होत्या. परंतु सदर बँकेचे संचालक आणि सर्वेसर्वा सुरेश ज्ञानोबा
कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना सुरेश कुटे यांनी सर्व ठेवीदारांची घोर
फसवणुक करत सर्व ठेवी स्वतःच्या तिरुमला उद्योग समुहात वापरल्या आहेत. आज
हे ठेवीदार बँकेकडे आपल्या आयुष्याची जमा पुंजी मागत आहे.
परंतु सुरेश कुटे यांनी लोकांच्या ठेवी लोकांना परत न करता त्यांची बँक
मागील ३ महिन्यापासुन बंद करुन पसार झालेला आहे. आमच्या मतदार संघातील
अंबड तालुक्यातील २ हजार ठेवीदारांचे जवळपास १०० कोटी रुपये अंबड शाखेत
ठेवी जमा केलेल्या आहेत. या सर्वसामान्य नागरिकांनी १२ फेब्रुवारी रोजी
पासुन तहसील कार्यालय अंबड येथे आमरण उपोषण सुरु केल

Previous articleविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षक व पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका ः डॉ. बाबासाहेब वाघ
Next articleबोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश स्कुलमध्ये फन फेअर कार्यक्रम सपंन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.