आशाताई बच्छाव
माझ्या राजाचं नाव गाजतयं- गड किल्ल्याच्या दगडावर
जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पराक्रम आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. भारतातील सर्वात नीडर आणि साहसी राजांच्या श्रेणीमध्ये त्यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. 19 फ्रेबुवारी रोजी मराठी कुटुंबात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव शिवाजी भोसले होतं. त्यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा जंगी स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी सर्वजण ऐकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा, शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन शिवजयंती साजरी करतात.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक साहसी, बुद्धीमान, शौर्यवीर आणि दयाळू शासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 साली मराठा कुटुंबात महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपतींचे वडील शहाजी राजे आणि जिजामाता होत्या. राजमाता जिजाई यांनी छत्रपतींना उत्तम शासक आणि योद्धा होण्यासाठी घडवलं. लहानपणी शिवाजी महाराज त्यांच्या वयाच्या मुलांना एकत्र जमा करून नेता बनून युद्ध करणे आणि किल्ला जिंकण्याचा खेळ खेळत असत. त्यांचे गुरू होते दादाजी कोंडदेव.युवावस्थेत येताच त्यांनी लहानपणीचा खेळ खरा करत खऱ्या शत्रूवर आक्रमण करून किल्ले जिंकण्यास सुरूवात केली. जसं शिवाजी महाराजांनी पुरंदर आणि तोरणासारख्या किल्ल्यावर आपला अधिकार मिळवला. तसं त्याचं नाव आणि कार्य संपूर्ण दक्षिणेत पसरलं. ही बातमी आगीप्रमाणे आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोचली. अत्याचारी असणारे सर्व शासक त्यांचं फक्त नाव ऐकून घाबरू लागले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आतंकित झालेला विजापूरचा राजा आदिलशाहने त्यांना बंदी न बनवता आल्यामुळे महाराजांचे वडील शहाजी राजांना कैद केलं. हे कळताच महाराज संतापले. त्यांनी नीती आणि साहस यांच्या साहाय्याने छापेमारी करून लवकरच वडिलांना कैदेतून मुक्त केलं. तेव्हा विजापूरच्या राजाने शिवाजी महाराजांना जीवंत किंवा मुर्दा पकडून आणण्याचा आदेश देत आपल्या सेनापती अफजल खानला पाठवलं. त्याने बंधुभाव आणि सामंजस्याचं खोटं नाटक करत शिवाजींना मिठी मारून मारण्याचा प्रयत्न केला. पण समजूतदार महाराजांनी आपल्या हातात लपवलेल्या वाघनखांमुळे अफजल खानचं मारला गेला. यामुळे त्याच्या सेनेने आपल्या सेनापतीला मेलेलं पाहून तिकडून पळ काढला.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय शासक होते. ज्यांनी मराठी साम्राज्य उभं केलं. त्यामुळे महाराजांना एक अग्रगण्य वीर आणि अमर स्वातंत्र्य सेनानी म्हटलं जातं. वीर शिवाजी राष्ट्रीयतेचे जीवंत प्रतीक होते.बहुगुणी प्रतिभावान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रात 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते पण अनेक संघटना शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हिंदू कॅलेंडरप्रमाणे येणाऱ्या तिथी अनुसार साजरा करतात. त्यांच्या वीरतेमुळे त्यांना एक महान राष्ट्रपुरूषाच्या रूपात ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये तीन आठवड्यांच्या आजारपणानंतर रायगडावर झाला.पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत आणि राहतील. जय भवानी जय शिवाजी. शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा.
रामभाऊ आवारे
राज्य प्रसिध्दी प्रमुख- युवा मराठा महासंघ






