Home अमरावती अमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय होणार

अमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय होणार

86

आशाताई बच्छाव

IMG_20240207_180025.jpg

अमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय होणार

आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दर्शविली सहमती

अमरावतीत १०० खाटांचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी
गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
अमरावती ०७ फेब्रुवारी : – अमरावती मधील आरोग्य सेवा अधिक अद्यावत , बळकट व विस्तारित करून गरीब व गरजू रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात ,त्याअनुषंगाने अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिकाच राबविली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात ८०० खाटांचे नवीन रुग्णालय , जिल्हा स्त्री रुग्णालय येथे २०० खाटांची नूतन इमारत तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील विस्तारित आरोग्य सेवा सुविधा , नवीन युनिट व वैद्यकीय संसाधनाची पूर्तता असो, आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तसेच अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून हे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय मार्गी लावले आहेत . तसेच येत्या शैक्षणिक सत्रापासून अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय देखील कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत . अशातच आता एका नवीन आरोग्य सेवेची भर पडणार असून अमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाची स्थापना लवकरच होणार आहे. या संदर्भात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
औषधी चिकित्सा पद्धती मधील आयुर्वेद ही अत्यंत प्राचीन अशी चिकित्सा पद्धती आहे. अनेक दुर्मिळ व जुनाट आजारांची गुणकारी चिकित्सा ही आयुर्वेदातून शक्य असल्याचे संशोधन आहे. त्यामुळे अनेक वैद्य आयुर्वेदाचे शिक्षण घेत असून व्याधिग्रस्त सुद्धा आयुर्वेद उपचारातून बरे होतात. व ही चिकित्सा पद्धती कमी खर्चिक असल्याने सामान्य व गरजू रुग्णांना याचा लाभ घेणे सहज सोयीचे असल्याने महाराष्ट्राच्या सर्व विभागामध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालये स्थापन झालेले आहेत.
मात्र अमरावती विभागात अद्याप शासकीय आयुर्वेद महाविद्यालय स्थापन झालेले नाही. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती विभागातील गरीब घटकांबरोबरच ग्रामीण व दुर्गम-अतिदुर्गम भागातील लोकांना आयुर्वेद चिकित्सा पद्धतीतून चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची नितांत गरज आहे. अमरावतीत १०० खाटांचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय स्थापन झाल्यास आरोग्य सेवा अधिक बळकट होऊन त्याचा गरीब व गरजू रुग्णांना लाभ होणार आहे. या बाबत सुद्धा आमदार महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांना अवगत केले.
यावर उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सकारात्मकता दर्शविली असून लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता अमरावती विभागात लवकरच १०० खाटांचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन होणार असून अमरावतीला नवीन आरोग्य संजीवनी बहाल होणार आहे.

Previous articleअमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय होणार
Next articleअमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय होणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.