आशाताई बच्छाव
नवनीत राणांनी काँग्रेसचा विचार करावा: अशोक चव्हाण यांनी घातली राणादांम्तांना साद, रामावर भाजपची मक्तेदारी नसत्याची टीका.
————–
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आपल्या काँग्रेस विरोधी विचारण्यासाठी ओळखल्या जातात. पण आता त्यांनाच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा विचार करण्याची साद घातली आहे. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नवनीत राणा यांना मोठी मदत केली. भाजपात गेल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली? याचा विचार करून त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणालेत श्रीरामावर भाजपची मक्तेदारी नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. काँग्रेसचे विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने अशोक चव्हाण अमरावतीच्या दारावर आहेत. त्यांनी गुरुवारी येथील पत्रकारांशी संवाद साधताना नवनीत राणा यांना चुचकारले. ते म्हणाले की अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा काँग्रेस सोबत निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपा मध्ये उडी मारली. आता पुन्हा त्यांनी काँग्रेसला विचारात घेतले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांनी मोठी मदत केल्याची आठवणही चव्हाण यांनी यावेळी नवनीत राणा यांना करून दिली. तसेच भाजप सोबत गेल्यानंतर नवनीत राणा व रवी राणा यांची काय अवस्था झाली हे लोकांना ठाऊक आहे. असा टोलाही त्यांनी हाणला लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यातच इंडिया आघाडी मजबूत होत असल्यामुळे सत्ताधार्याकडून देशात संभ्रमावस्थ निर्माण केली जात आहे. निवडणूक जवळ जवळ येईल तशा अनेक गोष्टी वाढतील. भाजप याप्रकरणी वेगवेगळ्या खेळी खेळत आहेत. पण या खेळींना आता कोणताही महत्त्व उरले नाही. असे अशोक चव्हाण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाण साधतांना म्हणाले. इंडिया आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घेतले पाहिजे, असा पुनरच्याही त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी आघाडीतील इतर पक्षावर मी बोलणार नाही. काँग्रेसची या विषयाची भूमिका अत्यंत स्पष्ट असून, त्यावर आम्ही ठाम आहोत. असे अशोक चव्हाण म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही श्रीरामाची पूजा दररोज करतो. श्री रामावर एकट्या भाजपची मक्तेदारी नाही. भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करत आहे. मंदिरात जाण्यासाठी सर्व दिवस शुभ असतात. असा कोणताही एखादा मुहूर्त शुभ व उर्वरित दिवस अशुभ असतो असं काहीही नाही. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी आगामी निवडणुकीत काँग्रेस देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल यात शंका नाही, असे अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.






