Home नाशिक देवरगाव ला अभिनव बालविकास च्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती...

देवरगाव ला अभिनव बालविकास च्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

249

आशाताई बच्छाव

IMG_20240112_195832.jpg

देवरगाव ला अभिनव बालविकास च्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर देवरगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
अभिनव बालविकास मंदिर देवरगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनव बालविकास चे मुख्याध्यापक श्री.तुषार कोर. सर होते. त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी रिहान शेख,कृष्णा शिरसाठ, अथर्व कुरणे,इशांत शिंदे विराज शिंदे या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले.शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयातील शिक्षक महेश घोरपडे यांनी राजमाता जिजाऊ यांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगीतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा देवरे यांनी केले तर आभार नितीन बोरसे यांनी मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Previous articleदेगलुर मध्ये जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.
Next articleदहिगाव उपसा सिंचन मध्ये देवळाली गावचा समावेश करा मुख्यमंत्र्याची प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.