Home नाशिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरती

112

आशाताई बच्छाव

IMG_20240112_183631.jpg

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरती
अंशुराज पाटील वृत्तसंपादक युवा मराठा न्युज
नाशिक, दिनांक १२ जानेवारी- दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली. भारत विश्वगुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी यावेळी केला.

यावेळी गंगा पुरोहित संघाच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चांदीचा अमृत कलश, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल, दिलीप शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतिक शुक्ल, वैभव दिक्षित, चंद्रशेखर गायधनी, शेखर शुक्ल, अतुल गायधनी, अमित पंचभैये, वैभव बेळे, भालचंद्र शौचे, उपेंद्र देव आदीसह पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन
Next articleयुवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.