Home जळगाव चाळीसगावात डॉक्टरची कार नेली चोरून

चाळीसगावात डॉक्टरची कार नेली चोरून

117

आशाताई बच्छाव

IMG_20231213_062134.jpg

चाळीसगावात डॉक्टरची कार नेली चोरून

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शहरातील डॉक्टरच्या घराच्या बेसमेन्टमध्ये लावलेली सुमारे 5 लाख रूपये किंमतीची स्पोर्ट कार चोरून नेल्याची घटना घडली असून चाळीसगाव शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, स्त्रीरोगतज्ञ डॉ. संजय चव्हाण यांचे हिरापूर रोडवर हॉस्पीटल आणि घर आहे. त्यांनी त्यांच्या घराच्या बेसमेन्टमध्ये एमएच.19 बीजे.6571 ही काळ्या रंगाची पॅजेरो स्पोर्ट कार लावलेली होती. दि.11 रोजी रात्री 11 वाजता ते दि.12 रोजी पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कार चोरून नेली.
याप्रकरणी डॉ. संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 379,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.

Previous articleरस्ते अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
Next articleमुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.