Home जळगाव चाळीसगावात जनजागृतीसाठी 34 इव्हीएम मशिन दाखल

चाळीसगावात जनजागृतीसाठी 34 इव्हीएम मशिन दाखल

123

आशाताई बच्छाव

IMG_20231211_204527.jpg

चाळीसगावात जनजागृतीसाठी 34 इव्हीएम मशिन दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- निवडणूक आयोगाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी प्रात्यक्षिक सादर करून मतदान यंत्र सुरक्षित असल्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. चाळीसगाव तालुक्यात ही जनजागृती होणार असून या पार्श्वभूमीवर भुसावळ येथून सुमारे 34 इलेक्ट्रिक मतदार यंत्रे प्रशासनाकडे आली आहेत.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगांव श्रीकर चिंचकर यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघास भेट देऊन मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्ष 2024 कार्यक्रमाचा तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीबाबत बीएलओ यांचेशी चर्चा करून विविध निवडणूक कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी जनजागृतीसाठी ईव्हीएम अर्थात इले्नट्रीक मतदार यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉंगरुमला भेट दिली. यावेळी चाळीसगाव उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले,तहसीलदार प्रशांत पाटील,निवडणूक नायब तहसिलदार संदेश निकुंभ,निवडणूक महसूल सहायक तुशांत अहिरे उपस्थित होते.
मतदान जनजागृतीबाबत पथनाट्य
दरम्यान चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात अभिनव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी मतदार नोंदणी आणि मतदान जनजागृती पर पथनाट्य सादर केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रमोद हिले,तहसीलदार चाळीसगाव तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी प्रशांत पाटील, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, गट शिक्षण अधिकारी विलास भोई आदी उपस्थित होते.

Previous articleमोहफुलांपासून इथेनॉल निर्मिती करा : आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी
Next articleबैठकीत विद्रोही मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदी गणेश निकम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.