Home नांदेड राज्यस्तरीय सल्लागार समितीमध्ये प्रा. बी. आर. कत्तुरवार सर यांची निवड

राज्यस्तरीय सल्लागार समितीमध्ये प्रा. बी. आर. कत्तुरवार सर यांची निवड

105

आशाताई बच्छाव

IMG_20231211_082252.jpg

राज्यस्तरीय सल्लागार समितीमध्ये प्रा. बी. आर. कत्तुरवार सर यांची निवड

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर:-अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग नेहमीच संशोधन कार्य व शैक्षणिक गुणवत्तेमध्ये नेहमीच प्रगतीशील राहीलेला आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू महोदयांनी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील प्रा. डॉ. बी. आर. कतुरवार यांचे योगदान लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ‘विषय तज्ञ’ म्हणून राज्यस्तरीय अभ्यासक्रम समितीमध्ये सदस्य पदी नियुक्ती केली आहे.
प्रा. बी आर कतुरवार सध्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे लोकप्रशासन अभ्यास मंडळ , चेतना स्वायत महाविद्यालय मुंबई येथे राज्यशास्त्रअभ्यास मंडळाचे सदस्य म्हनुण कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ (सात) विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली असुन सध्या एकूण ५ (पाच) विद्यार्थी पीएच. डी. साठी संशोधन कार्य करीत आहेत.
महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाला राज्यस्तरीय समितीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाल्याबदल
अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , डॉ. एस. एम देबडे , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व प्रा. ज्ञानेश्वर कोकणे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. बी. आर. कतुरवार यांचे आभिनंदन केले आहे.

Previous articleस्वराज्य पोलिस मित्र संघटना जळगाव यांच्या तर्फे शिव महापुराण कथेच्या स्थळी आलेल्या भाविकांना बिस्कीट वाटप
Next articleकेळी पिक विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.