आशाताई बच्छाव
जगदिश बधान (सटाणा प्रतिनिधी) यांजकडून :- अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करुन शेतकरी बांधवांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साकडे घातले.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागलाण, निफाड, दिंडोरी, नांदगाव, चांदवड, येवला, मनमाड, कळवण व मालेगाव या तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. शेतपिके त्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब व फळबागा, तसेच कांदा, टोमॅटो, गहू, हरभरा, ऊस, भात, भाजीपाला आदी पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागावर मोठे अस्मानी संकट ओढावले असल्याने या भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करुन आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
फोटो ओळी – गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देवून दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना देतांना जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार.






