Home नाशिक नाशिकमध्ये निलमताई गो-हे यांना युवा मराठा महासंघाचे निवेदन

नाशिकमध्ये निलमताई गो-हे यांना युवा मराठा महासंघाचे निवेदन

201

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-063024_WhatsApp.jpg

इम्तियाज अत्तार (नाशिक रोड प्रतिनिधी)
आज दिनांक १९/१०/२०२३ रोजी नाशिक जिल्हा येथे आलेल्या मा ना डॉ निलिमा ताई गोह्रे (उप सभापती महाराष्ट्र विधान परिषद) यांना भेटून नाशिक जिल्हा रुग्णालयातील सिव्हील कॅन्टीन हि अनाधिकृत असून वारंवार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक महानगरपालिका नगर रचना विभाग, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय यांना निवेदन देण्यात आले होते परंतु आज पर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही या आशयाचे निवेदन देण्यात आले असून सिव्हील कॅन्टीन हि अनाधिकृत आहे हे लवकरच काढण्यात येईल मात्र आजही सदर कॅन्टीन राजरोस पणे शासकीय रुग्णालय आवाराची भिंत फोडून चालू आहे शासकीय जागेत कोणताही व्यवसाय करण्यास शासनाने बंदी घातली असतानाही हि कॅन्टीन कोणाच्या आशिर्वादाने सूरू आहे कारण येथे दिवसभर रूग्ण ये-जा करतात आणि अस्वच्छते मुळे रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ शकतो व आजार बळाऊ शकतो हे माहीत असूनही जिल्हा रुग्णालयातील अधिकारी सपशेल मुद्दाम डोळेझाक करताना दिसत आहे यांना कसलाही फरक पडत नाही हि शोकांतिका आहे इतकी वर्षे हि कॅन्टीन अनाधिकृत आहे हे माहीत असूनही जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी कार्यवाही करत नसल्याची तक्रार आज निवेदनाव्दारे करण्यात आली असून आता तरी शासन दरबारी न्याय होतो की नाही हे बघावे लागेल या प्रसंगी युवा मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री तौफिक भाऊ अत्तार, युवा मराठा वृत्तपत्रात नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार, फरिद( मामु) अत्तार तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleनाशिकला मुस्लीम बांधवाचे हजरत गौस पाक यांची ग्यारवी शरिफ उत्साहात साजरी
Next articleबच्चू कडू यांच्या प्रेरणेतून वेध भविष्याचा हा विदयार्थ्यांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.