Home जळगाव भावाला जिवे मारण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार ! जामनेर तालुक्यातील...

भावाला जिवे मारण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार ! जामनेर तालुक्यातील एका गावात घडली घटना

160

आशाताई बच्छाव

IMG-20231006-WA0021.jpg

भावाला जिवे मारण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार !
जामनेर तालुक्यातील एका गावात घडली घटना

योगेश पाटील, जळगांव.

माझ्या सोबत पळून जावून लग्न कर जर तु आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी व ‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर तरुणीची जबरदस्ती सही घेत अत्याचार केल्या प्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना जामनेर तालुक्यातील एका गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत रहिवासास असून तरुणीला संशयित आरोपी मयूर याने दि. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर तसेच दि. ६ सप्टेंबरपासून १५ दिवस वेळोवेळी जळगाव येथील वकिलाच्या घरी आणि गावातील त्याच्या घरी तू जर माझ्या सोबत पळून जावुन लग्न कर, तू जर आली नाही तर तुझ्या भावाला मारुन टाकेन, अशी धमकी देत तसेच तरुणीकडून ‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’चे नोटरीवर सही घेवून इच्छा नसतांना तिच्या सोबत वेळोवेळी बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी भादवि कलम ३७६ (२) आणि ५०६ प्रमाणे पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करीत आहेत.

Previous articleजळगावकर ‘ऑक्टोबर हिट’ने हैराण; उकाड्यातून कधी मिळणार दिलासा?
Next articleमालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी बॅनर लावून दाखवतात स्वच्छताचे धडे मात्र झोपडपट्टी भागातील गटारींमध्येच पडले किडे….!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.