Home गडचिरोली खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भव्य रक्तदान,व आरोग्य तपासणी शिबीरांचे उद्घाटनाचा कार्यक्रम...

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भव्य रक्तदान,व आरोग्य तपासणी शिबीरांचे उद्घाटनाचा कार्यक्रम गडचिरोली शहरातील लांझेडा, इंदिरानगर येथे संपन्न.

112

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0082.jpg

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भव्य रक्तदान,व आरोग्य तपासणी शिबीरांचे उद्घाटनाचा कार्यक्रम गडचिरोली शहरातील लांझेडा, इंदिरानगर येथे संपन्न.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर शक्तीकेंद्र यांच्या वतीने देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाडा या कार्यक्रमा निमित्त भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर तथा नमो प्रदर्शनी,आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड नोंदणी वाटपाचा कार्यक्रम लांझेडा, इंदिरानगर येथे बाल गणेश मंडळा जवळ आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमा निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी दीपप्रज्वलन करुन गणपती बाप्पा चे दर्शन घेत शहरातील लांझेडा,इंदिरानगर येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करून स्वतः शुगर बीपी तपासून शुभारंभ करून यांचा शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले. या निमित्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी सुद्धा बीपी शुगर तपासणी केली.

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहर महामंत्री विनोद देओजवार,शहर महामंत्री हर्षल गेडाम,भाजपाचे श्याम वाढई, नरेश हजारे,कान्होजी लोहंबरे, तसेच मोठया संख्येनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते,व इंदिरानगरातील बाल गणेश मंडळाचे सदस्यगण उपस्थितीत होते.

Previous articleसौ.योगिता पिपरे यांची “भाजपा जिल्हा महामंत्री” पदी नियुक्ती
Next articleपुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.