Home जळगाव १८ जणांची फसवणुक करणाऱ्या टाकळीच्या तिघांना अटक

१८ जणांची फसवणुक करणाऱ्या टाकळीच्या तिघांना अटक

300

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0063.jpg

१८ जणांची फसवणुक करणाऱ्या टाकळीच्या तिघांना अटक
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – सीएनजी गॅसपंप मंजूर करण्याचे आश्वासन देवून सुमारे 20 लाख रूपये देवून देखील गॅस पंप मिळवून न देता फसवणुक केल्याप्रकरणी टाकळी प्र.चा.येथील संभाजी दगडू पाटील, अनिकेत संभाजी पाटील, व आकाश संभाजी पाटील यांना चाळीसगाव शहर पेालीसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात फसवणुक होणाऱ्यांची संख्या वाढून 18 वर गेली आहे.
स्वप्नील युवराज चौधरी यांनी फसवणुक प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात भादवि कलम 420,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपासादरम्यान एकुण 18 जणांची पशुपालन कर्ज, पर्सनल लोन,शेळी पालन कर्ज मंजुर करून देतो किवां अनुदान मिळवून देतो अशा कारणांसाठी पैसे घेवून त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज व अनुदान मिळवून न देता त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चौधरी यांच्यासह 18 जणांकडून संशयित संभाजी पाटील व त्याच्या दोघा मुलांनी सुमारे 30 लाख 54 हजार रूपये उकळून फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांना या गुन्ह्यात आणखी काही लोकांची फसवणुक झाल्याचा संशय आहे.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी व पोकॉ.अमोल पाटील हे करीत आहे.

Previous articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि) च्या संवाद बैठकीत १४ नवनिर्वाचित सभासदांचा प्रवेश
Next articleधान खरेदीची नवी व्यवस्था तयार करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.