Home नाशिक वडिलांना आयुष्यात खाली मान घालावी लागेल असे कृत्य करू नका – वसंत...

वडिलांना आयुष्यात खाली मान घालावी लागेल असे कृत्य करू नका – वसंत हंकारे

204

आशाताई बच्छाव

IMG-20230919-WA0040.jpg

वडिलांना आयुष्यात खाली मान घालावी लागेल असे कृत्य करू नका – वसंत हंकारे

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

आपल्या जीवनात अपयश आलं तर आपले आई-वडील आपल्याला आधार देत असतात परंतु असं कुठलही कृत्य करू नका ज्या कृत्यामुळे आपल्या वडिलांना आयुष्यात खाली मान घालावी लागेल असे प्रतिपादन व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.
निफाड येथील वैनतेय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थ्यांसाठी सुसंगती सदा घडो ,सुजन वाक्य कानी पडो या विषयावर आयोजित व्याख्यान देतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त वि.दा. व्यवहारे, संस्थेचे सचिव रतन पाटील वडघुले आदी मान्यवर होते प्रास्ताविक वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य एम एस माळी यांनी केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हंकारे पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपण कोण आहे ते ओळखा 21 व्या शतकात आम्हाला चारित्र्यवान माणसं घडवायची आहेत आपण चंद्रावर पोहचलो परंतु वृद्धाश्रमात आई-वडिलांची संख्या वाढत आहे आई वडील आपल्यावर चांगले संस्कार करीत असतात मुलगा जेव्हा आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपले वडील मोठे होतात 21व्या शतकात अवघे जग तंत्रज्ञानाने मुठीत घेतलय मोबाईल आले ,तंत्रज्ञान आले इंटरनेटच्या जगात मात्र आयुष्यभर मुला बाळांची काळजी घेणाऱ्या आई-वडिलांना मूल विसरत चाललीय आई वडिलांनी जे कष्ट घेतले त्या कष्टामुळे तुम्हाला ताठ मानेने जगता येते मुलांना घडवता घडवता वडील आयुष्यभर झिजत असतात मुलं म्हणजे आई-वडिलांची संपत्ती असते परंतु मुलगा जेव्हा हातातून निघून जातो तेव्हा बापाचं मन मनातून मेलेलं असतं. आपण असं कर्तुत्व कमवा की वडिलांना इज्जत प्राप्त होईल परंतु तुमच्यामुळे जर वडिलांची गेली तर करोडो रुपये भरले तरी वडिलांची इज्जत परत मिळत नाही. जीवनात असं जगा की वाघासारख्या वडिलांना शेवटचा श्वास वाघासारखाच घेता आला पाहिजे. सूत्रसंचालन गुलाब टकले यांनी केले.याप्रसंगी शिवाजी ढेपले, उपप्राचार्य एन डी शिरसाट , पर्यवेक्षक टी. एस तलवारे , वैनतेय इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका पल्लवी सानप, प्रा चंद्रकांत नाईकवाडे, मुख्याध्यापिका प्रसन्ना कुलकर्णी, नंदू पडोळ, संदीप शिंदे आदींसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

@ रुद्र सोनवणे या विद्यार्थ्याने वसंत हंकारे यांचे स्केच रेखाटले होते सदर रेखाचित्र सोनवणे याने वसंत हंकारे यांच्याकडे सुपुत्र केले.

@ वसंत हंकारे यांचे भावनात्मक व्याख्यान चालू असताना अनेक विद्यार्थी ,विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या.