Home नाशिक गोंदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशालीताई शिरोळे यांची वारकरी मंच नाशिक जिल्हा महिला...

गोंदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशालीताई शिरोळे यांची वारकरी मंच नाशिक जिल्हा महिला प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती

191

आशाताई बच्छाव

IMG-20230919-WA0041.jpg

गोंदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशालीताई शिरोळे यांची वारकरी मंच नाशिक जिल्हा महिला प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच महाराष्ट्र राज्य सदस्य तथा मविप्र संचलित गोंदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशालीताई शिरोळे / वाजे मु धारणगाव पो देवपुर (सिन्नर) यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला प्रसिद्धीप्रमुख नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे .
वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष हभप निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर) यांच्या आदेशानुसार, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांच्या शिफारशीनुसार, जिल्हा अध्यक्ष शंकरराव छबू कोल्हे नैताळे व महिला जिल्हा अध्यक्ष सौ सवितामाई अशोक पगार (मनमाड) यांच्या सुचनेनुसार वारकरी संप्रदायाबद्दलची असलेली निष्ठा व भाव लक्षात घेऊन आदर्श मुख्याध्यापिका सौ वैशालीताई शिरोळे यांची नाशिक जिल्हा महिला प्रसिद्धीप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे.
गोंदे (सिन्नर) विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ वैशालीताई शिरोळे (वाजे) यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर), प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के, प्रदेश संघटक शरद कैलास अढाव, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव, कोकण विभाग कार्याध्यक्ष ह भ प नामदेव शंकर पिचूर्ले रत्नागिरी, विदर्भ विभाग कार्याध्यक्ष केशव महाराज भुजाडे , ह भ प राजेंद्र महाराज पाटील,वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ सवितामाई पगार, जिल्हा उपाध्यक्ष महिला सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, जिल्हा उपाध्यक्ष उमेश केशव चव्हाण दरसवाडी,महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ पुष्पाताई पवार नागापूर, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे पाटील ममदापूर, संघटक दत्ता महाराज जाधव वागळुदकर, जिल्हा समन्वयक सौ मनीषा दिपक भोर निफाड, हभप नंदकिशोर महाराज दौंड तळवाडे नांदगाव, जिल्हा महिला संघटक सौ सरीताताई नागरे मातुलठाण येवला, जिल्हा महिला सचिव हभप ऋतुजा ताई दरेकर आदींनी अभिनंदन केले आहे

@ आमचे मार्गदर्शक तथा वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांच्या आदेशानुसार व नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा सौ सवितामाई पगार (मनमाड) यांनी वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी म्हणून मला वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला प्रसिद्धीप्रमुख पदाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी सार्थ करण्यासाठी मी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसारासाठी करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन.

सौ.वैशालीताई शिरोळे (वाजे)
जिल्हा महिला प्रसिद्धीप्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य गोंदे (सिन्नर)

Previous articleलासलगाव गटाचे चे प्रश्न मार्गी लावा- दिशा समिती मार्फत सौ सुवर्णाताई जगताप यांची मागणी
Next articleवडिलांना आयुष्यात खाली मान घालावी लागेल असे कृत्य करू नका – वसंत हंकारे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.