Home नांदेड शाळेतील विद्युत पोल हटविलयाने विद्यार्थ्यांचा धोका टळला !

शाळेतील विद्युत पोल हटविलयाने विद्यार्थ्यांचा धोका टळला !

235

आशाताई बच्छाव

IMG-20230819-WA0042.jpg

शाळेतील विद्युत पोल हटविलयाने विद्यार्थ्यांचा धोका टळला !

पालकांनी मानले हिप्पळनारी ग्राम पंचायतीचे आभार !

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड तालुक्यातील हिप्पळनारी जि.प. प्राथमिक शाळेतील मैदानात गेल्या तीस वर्षांपासून धोकादायक विद्युत पोल होते. पावसाळ्यात त्या विद्युत पोल मध्य कधी – कधी आर्थिंग उतरत असल्याने त्यापासून विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला होता. ते विद्युत पोल इतरत्र हटवावे अशी मागणी पालकांनी करीत होते. पण गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून त्या मागणीची दखल कोणीही घेतली नव्हती. त्यावर नुसती चर्चा केली जात होती काम मात्र जैसे थेच होते. पण हिप्पळनारी ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच म्हणून श्रीमती इंदरबाई रामचंद्र शिंदे यांनी येताच या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत. पंधरा 15 ऑगस्ट २०२३ भारतीय स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर विद्युत पोल हटविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मिटिंग मध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या सहमतीने ठराव पास करून घेऊन शाळेतील ते धोकादायक विद्युत पोल त्वरित अन्यत्र हटवून धोक्यापासून विद्यार्थ्यांचा बचाव केला आहे. त्या पोलची तारे गावातील लक्ष्मी मंदिरावरील लिंबाच्या झाडाच्या फांद्या लागत होत्या त्या फांद्या तोडण्याचे अवघड काम येथील गोपाळराव देशमुख व त्यांचे चिरंजीव पिंटु देशमुख सह त्यांच्या साथीदारांनी मोलाचे सहकार्य केले म्हणून ते पोल हटविणे सोपे गेले आहे. मुख्य म्हणजे शाळेतील विद्युत पोल हटविण्याची शाळेची व पालकांची अनेक दिवसापासूनची मागणी चंद्रकांत शिंदे यांनी पूर्ण केल्यामुळे येथील हिप्पळनारी ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचे शाळेच्या व पालकांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.

Previous articleसकारात्मक विचार व कृतीतच सन्मानाने जगण्याचा मार्ग – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
Next articleमालेगांवी बी.डी.ओ.च्या दालनात होणार मौन धारण आंदोलन २४ आँगस्टपासून
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.