Home गडचिरोली खासदार अशोकजी नेते यांच्या मागणीला मान देऊन राष्ट्रपती महामहीम द्रोपदीजी मुर्मू हया...

खासदार अशोकजी नेते यांच्या मागणीला मान देऊन राष्ट्रपती महामहीम द्रोपदीजी मुर्मू हया दि.०५ जुलै २०२३ ला गडचिरोलीला येणार..

348

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0044.jpg

खासदार अशोकजी नेते यांच्या मागणीला मान देऊन राष्ट्रपती महामहीम द्रोपदीजी मुर्मू हया दि.०५ जुलै २०२३ ला गडचिरोलीला येणार..
—————————————-
राष्ट्रपती महामहिम द्रोपदीजी मुर्मू गडचिरोली ला येणार हे निश्चित झाले
—————————————-

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-:-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शीलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी खासदार अशोकजी नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांनी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी जी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे
दि.१० मे २०२३ रोजी भेट घेत मागणी केली होती.त्यावेळी सोबत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते.

त्याच अनुषंगाने खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या मागणीनुसार महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रोपदी मुर्मू जी हया ५ जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला गडचिरोलीत येणार अशी माहिती खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दिली.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत,अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार हे एक इतिहासातील पहिलीच कदाचित घटना असेल याचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान खासदार अशोकजी नेते यांनी केले.

Previous articleभगवान श्रीकृष्ण उपदेश —
Next articleगडचिरोली येथे २३ जून रोजी भाजपाच्या संयुक्त मोर्चाचे संमेलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.