Home गडचिरोली भाजप महिला मोर्चाच्या वतीने आधार विश्व फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान

भाजप महिला मोर्चाच्या वतीने आधार विश्व फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान

162

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0025.jpg

भाजप महिला मोर्चाच्या वतीने आधार विश्व फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान

मोदी-9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत उपक्रम

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मोदी-9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत सामाजिक संस्था, अंगणवाडी केंद्र व अन्य संस्था द्वारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातही विविध संस्था व अंगणवाडी केंद्राद्वारे महिलांना चांगली सेवा देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 13 जून रोजी गडचिरोली येथील आधार विश्व फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी व सदस्यांचा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात सत्कार करण्यात आला.
यावेळी आधार विश्व फाउंडेशन च्या अध्यक्ष गीताताई हिंगे ,सचिव सुनीता साळवे , उपाध्यक्ष विनाताई जम्बेवार, सदस्य विजया मने, कांचन चौधरी, धनश्री तुकदेव व महिला पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महिला आघाडीच्या गडचिरोली शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसाकडे शहर सचिव पूनम हेमके, नीताताई बैस, आधार विश्व फाउंडेशनच्या सदस्य प्रिती मेश्राम, प्रिया निशाणे, साधना कंदोटीवार, लता बेहरे, अंजली देशमुख, सुनीता आलेवार, सीमा कन्नमवार उपस्थित होत्या.
आधार विश्व फाउंडेशन गडचिरोली च्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच या संस्थेच्या सदस्या नेहमीच गरीब व गरजू महिलांना मदत करीत असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपच्या वतीने महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत त्यांचा सन्मान करण्यात आला.

Previous articleशेतकरी कामगार पक्षाची १७ जून ला जिल्हास्तरीय सभा
Next articleशासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी – प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.