आशाताई बच्छाव
देगलूर शहर व तालुका गुटखा विक्रीचे केंद्र म्हणून ओळख
देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे, युवा मराठा नूज नेटवर्क.
देगलूर शहर व तालूक्यामध्ये गुटखा सहज उपलब्ध हवे त्या प्रमाणात मिळत आहे.इतर प्रांतातून आयात करून हा गुटखा बागन टाकली येथे साठविण्यात येत आहे व येथूनच संपूर्ण शहर आणि तालुक्यामघ्ये विक्री करण्यात येत आहे, गुटखा माफियाने आता आपले पाय बिलोली,मुखेड,नांदेड जिल्हातही पसरलेले आहे,
दरम्यान या गुटखा माफियावर देगलूर येथील पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असून या गुटखा माफियाची कोणीही काही वाकड करू शकत नही असा आत्मविश्वास गुटखा माफिया दाखवीत असल्याने त्यांच्या मुजोरीपणास पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे दिसते.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंदी आहे याचाच फायदा घेत काही गुटखा माफियानि व अवैध धंदे चालकांनी इतर प्रांतातून गुटखा आयात करून छुप्या मार्गाने विक्री करत आहेत.
हा सर्व प्रकार पोलीस प्रशासनाला स्पष्ट पणे दिसत असला तरीही या गुटखा मिफियावर कोणत्या ही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याचे दिसून येत आहे.
गुटखा मिफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी असे जनतेतून मत वक्त होत आहे.