Home नाशिक ठेंगोडा ता.सटाणा येथील भव्य कुस्ती दंगल चा मानकरी ठरला नाशिक चा रोहित...

ठेंगोडा ता.सटाणा येथील भव्य कुस्ती दंगल चा मानकरी ठरला नाशिक चा रोहित अहिरे

123

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0001.jpg

ठेंगोडा ता.सटाणा येथील भव्य कुस्ती दंगल चा मानकरी ठरला नाशिक चा रोहित अहिरे
युवा मराठा न्यूज नयन शिवदे सटाणा विशेष प्रतिनिधी
ठेंगोडा ता._6 – येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने ग्रामीण भागातील भव्य मातीतील कुस्ती दंगल संपन्न झाली. यात शेवटच्या मानाची कुस्ती रोहित अहिरे नाशिक येथील बलकवडे तालिम संघाचा पहिलवान व बबलू पहिलवान खेडी येथील यांच्यात चुरशी चा दंगल प्रेक्षकांना बघावयास मिळाली.या मानाच्या कुस्तीचा विजयी पहिलवान रोहित अहिरे हा ठरला. विजेता रोहित आहिरे यास 21 हजार रुपये रोख बक्षीस माजी सरपंच आण्णा पगारे यांनी दिले व कोल्हापूर येथून आणलेला चांदीचा गदा विजयी पहिलावाला भेट.महाले, शिंदे, लाडे परिवाराकडून देण्यात आली.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील व कसमादे परिसरातील ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगल यावेळी ठेंगोडा येथे संपन्न झाल्या ठेंगोडा येथे अनेक वर्षांपासून खंड पडलेल्या कुस्त्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन भव्य कुस्त्याचे आयोजन घडून आणले. यावेळी लहान पैलवानां पासून मोठ्या पहिलावानांच्या जवळपास हजारो रुपयाच्या कुस्ती दंगल झाले. त्यात लहान मुलींच्या सुद्धा कुस्त्या घेण्यात आल्या.
दिल्ली,पुणे ,नाशिक , मालेगाव सह परिसरातील नामवंत पहिलावांनाची हजेरी लागली .यावेळी हजारो कुस्ती प्रेमी चाहत्यांनी या कुस्ती दंगलाचा आनंद लुटला.

Previous articleलोहार समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ होणे आवश्यक माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
Next articleडॉ मणिभाई प्रतिष्ठानाकडून पुण्यात पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवॉर्ड वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.