Home सामाजिक मालेगांवी राज्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एल्गार.. १४ मार्चपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर...

मालेगांवी राज्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एल्गार.. १४ मार्चपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्धार!             

161

आशाताई बच्छाव

IMG-20230310-WA0034.jpg

मालेगांवी राज्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एल्गार.. १४ मार्चपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्धार!                                      मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)- संपूर्ण महाराष्ट्रभरातील राज्य सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ तात्काळ मंजूर करावा, या व अशाच विविध मागण्यासाठी संपावर जाण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनानी जाहिर केला आहे. आज मालेगांव पंचायत समिती येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने व त्यासोबतच जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी निवेदन सादर केले असून, त्यात आपल्या जुन्या पेन्शन योजनेसह विविध हक्काच्या मागण्यांसाठी १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.यावेळी टि.एम.बच्छाव ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष,सुनील पवार,अशोक शेवाळे,बी.एन.पगार,बापू सोनवणे,दिनेश जाधव,श्रीमती मनिषा शेवाळे,ग्रामसेविका अहिरे,विस्तारधिकारी राजबन्शी,दिपक शेलार,निलेश पाटील,ज्ञानेश्वर मोतीराम पवार,अशोक बी वाघ यांचेसह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.प्रचंड घोषणाबाजी करीत पेन्शन योजना संपाबाबतची वातावरण निर्मिती यावेळी करण्यात आली,याप्रसंगी ज्ञानेश्वर मोतीराम पवार यांनी आपल्या आंदोलनाची व भुमिका कर्मचाऱ्यांना विषद केली.

Previous articleती लढली संकटांशी आणि जिंकली लढाई आयुष्याची…
Next articleजागर हिंदुत्वाचा जोगवा आई भगवतीचा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.