Home नाशिक मेशीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

मेशीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

133

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0018.jpg

देवळा ,/भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क:- मेशीच्या नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेसंमेलन मोठ्या उत्साहात साजरी
देवळा तालुक्यातील मेशी येथील नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेसंमेलनाचे उदघाटन कवी विष्णू मोरे व डान्स महाराष्ट्र डान्सची विजेती जिया मोरे यांच्या शुभहस्ते होऊन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ.सुनंदा शिवाजी आहिरे व शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार देवरे ,ग्रापंचायतीचे पदाधिकारी,सोसायटीचे पदाधिकारी गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार, विद्यार्थी पालक व शाळेचे सर्व कर्मचारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.ज्यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी डान्स महाराष्ट्र डान्सची विजेती जिया मोरे हिने पण आपली कला सादर केली व शाळेतील सर्व बाल कलाकारांनी उत्साहात आपले कलागुण पालकांसमोर सादर केले उत्तम प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत पालकांनी व विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.अशी माहिती प्राचार्य बोरसे सर व प्राचार्या भामरे मॅडम यांनी दिली.या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक श्री.दगा मावजी बोरसे व आमच्या संस्थेचे चेअरमन श्री. जे डी (बापू) बोरसे व संस्थेचे पदाधिकारी शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी बस चालक मदतनीस विद्यार्थी पालक पालकमाता उपस्थित होते

Previous articleआजचे आरोग्य सदर (शनिवार 28 जानेवारी) मुलांच्या तोंडातून ब्रश करूनही दुर्गंधी येत असेल तर हे उपाय करा
Next articleआरोग्य विभागातील स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.