आशाताई बच्छाव
निमगांवात जीवंत असलेल्या आईला मयत दाखविले,हरामी मुलांनी संपतीसाठी कारस्थान रचले..!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-ज्या मायमाऊलीने अनंत वेदना सोसून आपल्या अपत्यांना जन्म दिला त्याच हरामी औलादीच्या अपत्यांनी आपली जीवंत आई मेली असून,तिचा दशक्रीया विधी नाशिकला उरकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगांव तालुक्यात असलेल्या निमगांव येथील ही सत्यघटना असून,कमळाबाई हिरे या अत्यंत श्रीमंत घराण्यातील व एका राजकीय कुटूंबियाचे भाऊबंदकीतील असून,या कमळाबाई हिरे यांना दोन मुले माणिक हिरे व गुलाब हिरे अशी अपत्य असून,तर एक कल्पना नामक मुलगी आहे,स्वतःच्या जन्मदात्या आईला गेल्या अनेक दिवसापासून या मुले व मुलगी म्हणविणा-या निर्लज्ज त्रिकूटाने अतोनात त्रास दिला.कमळाबाई बाजीराव हिरे या वेगवेगळ्या ठिकाणी भीक मागून आपली उपजिवीका भागवित असताना त्यांना एका सदगृहस्थाने कळवणजवळील नांदुरीच्या सप्तशृंगी वृध्दाश्रमात पाठविल्याने कमळाबाईची तेथे चांगल्या प्रकारे व्यवस्था लागली.पण…कमळाबाईची संपती बळकावण्यासाठी या बेशरम त्रिकूट मुलांनी आपली आई मयत झाली असून,असा खोटा बनाव करुन त्या कमळाबाईचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम नाशिक येथील रामकुंडावर पार पाडला.या घटनेची चव्हाटयावर येताच व कमळाबाई हिरे या आजही सप्तशृंगी वृध्दाश्रमात जीवंत असताना मुलांनी केलेल्या या कृत्यामुळे सर्वत्र छि थू होत असून या कुटूंबाच्या निर्लज्जपणाचा धिक्कार केला जात आहे.तर या हरामी त्रिकूटावर तात्काळ कठोर कारवाई करुन त्यांना गजाआड करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.तर कमळाबाईचा दशक्रीया विधी करण्याअगोदर या त्रिकूटाने नेमक्या कोणत्या महिलेचा अंत्यसंस्कार केला याचाही शोध पोलिसांनी कसून करावा अशी तमाम जनतेच्या वतीने युवा मराठा परिवार मागणी करीत आहे.