आशाताई बच्छाव
आमदार डॉ.देवरावजी होळी यांचा गाडिचा अपघात
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात घडला अपघात गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. गडचिरोली येथून आरमोरी तालुकास्थानी दुर्गादेवी दर्शनासाठी जात असताना अपघात झाल्याचं समजतेय. येथील गाढवी नदीच्या पुलावर ऐन मधोमध दुचाकीस्वाराला वाचविताना गाडी ट्रकला धडकली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाल्याचं समोर आलं आहे. एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने आमदार डॉ. देवराव होळी आणि त्यांचे सहकारी सुखरूप वाचले. मात्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाल्याचं समजतेय. अद्याप दुचाकीस्वाराचे नाव व वास्तव्य कळू शकलेले नाही. अपघात होताच डॉ. देवराव होळी यांनी रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्त युवकाला मदत पोहोचवली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ दाखल झाले. आरमोरी पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा अधिक तपास करत आहेत