Home नांदेड चांडोळा येथील ढगफुटी व जाहुर मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले

चांडोळा येथील ढगफुटी व जाहुर मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले

240

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview-1.png

चांडोळा येथील ढगफुटी व जाहुर मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे चांडोळा व जाहुर अनंत चतुर्दशी दिनी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांडोळा महसूल मंडळात ६७ मिमी पावसामुळे ढगफुटी झाली तर जाहूर मंडळात ६० मिमी पावसांची नोंद झाली . मुखेड महसूल मंडळात ५७ तर अंबुलगा मंडळात ५१ मिमी पाऊस झाला . तालुक्यात एकूण ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून १० रोजीही दिवसभर पाऊस सुरुच होता . त्यामुळे कापूस , ज्वारी , तूर पीक आडवे झाले आहेत . तालुक्यात महिन्यामुखेखपासून पावसाने उघडीप दिल्याने पीक धोक्यात येवून वाळून गेली … सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला . खरीप हंगाम सुरुवातीला पेरणीनंतर पीक उगवणी काळात पावसाने लगातार २५ ते २० दिवस हजेरी लावल्याने पिकांची वाढ खुंटली . पुन्हा पिके पिवळी पडली . त्यातून कसेबसे शेतकरी सावरत असताना ९ सप्टेंबर रोजी सकाळपासून वातावरणात बदल झाला . दुपारी शहरात मोठा पाऊस झाला . शहराजवळील चांडोळा महसूल मंडळात ६७ मिमी म्हणजे ढगफुटी सृदश पावसाने झोडपून काढले तर जाहूर मंडळात ६० मिमी , मुखेड मंडळात ५७ मिमी , अंबुलगा मंडळात ५१ मिमी , येवती मंडळात ४४ मिमी , मुक्रमाबाद मंडळात ३७ मिमी पावसाची नोंद झाली . जांब बु आणि बाऱ्हाळी मंडळात कमी पाऊस झाला . या पावसाने कापूस पूर्ण आडवा झाला आहे . सोयाबीन , ज्वारी , तूर , उडीद , सूर्यफूल , ज्वारी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे . चांडोळा महसूल मंडळात अनेक गावांमध्ये शेताचे मोठे नुकसान झाले असून गोठ्यांची पडझड झाली आहे . शेतात पाणी साचली आहे . जाहूर भागातही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण पाटील बोडके यांनी सांगितले . कापसासह खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा कोलमडला असल्याचे सांगितले आहे . शनिवारीही दिवसभर पावसाची जोरात सुरुवात होती .

Previous articleकुंभार समाज संघटनेचे प्रमुख श्री विश्वनाथ कोलमकर यांना ओबीसीं पुरस्कार प्रदान.
Next articleजिप्सी’ मॉर्निंग ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रा. जय जोशी यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.