Home सोलापूर उपोषणाला बसलेल्या एका लहान चिमुरडीचा मृत्यू?

उपोषणाला बसलेल्या एका लहान चिमुरडीचा मृत्यू?

157

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0037.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: उपोषणाला बसलेल्या एका लहान चिमुरडीचा मृत्यू? १८ ऑगस्ट २०२२ या दिवसापासून चिकर्डे ग्रामपंचायत, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी ग्रामस्थ व त्यांच्याबरोबर एक लहान अपंग मुलगी उपोषणाला बसली असताना तिथे त्या उपोषणादरम्यान मृत्यू झाला, असे ग्रामस्थ यांनी सांगितले .ग्रामस्थांनी सांगितले की उन्हातल्या प्रकोपाने उपोषणाला त्रास होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या बालिकेचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. हे उपोषण ग्रामपंचायतीच्या एकूण निधीमध्ये ५ टक्के निधी हा अपंगासाठी राखीव असतो . चिकर्डे ग्रामपंचायत हा निधी अपंगासाठी वापरत नाही यासाठी हा उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. या उपोषणामध्ये त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ग्रामस्थांचं म्हणणे आहे की या चिमुरडीच्या दवाखान्याचा खर्च जवळपास दीड लाखाच्या आसपास आहे, तो शासनाने द्यावा अशी आमची विनंती आहे. प्रशासनाला विचारले असता त्यांनी सांगितले की या आजारी मुलीचा व या उपोषणाचा काहीही संबंध नाही असे सांगण्यात येत आहे .तिला दवाखान्यात दाखल केले होते तेथे तिचा मृत्यू झाला असे या प्रशासनाने सांगितले आहे. पुढील चौकशी होऊन निर्णय घेण्यात यावा असेही प्रशासनाने सांगितले.

Previous articleयंदा गणेशोत्सवासाठी चाकरमान्याची कोकणाकडे कुच!
Next articleऑनलाइन टेंडर मध्ये चुका केल्याने सीईओ यांनी कर्मचाऱ्याला केले निलंबित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.