Home गडचिरोली गोवंश कत्तलीसाठी नेणारे एकुण 14 ट्रक जप्त। गडचिरोली पोलीस दलास यश, दोन...

गोवंश कत्तलीसाठी नेणारे एकुण 14 ट्रक जप्त। गडचिरोली पोलीस दलास यश, दोन वेगवेगळ्या घटनेतील कारवाई

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0069.jpg

गोवंश कत्तलीसाठी नेणारे एकुण 14 ट्रक जप्त। गडचिरोली पोलीस दलास यश, दोन वेगवेगळ्या घटनेतील कारवाई

403 गोवंश जनावरांची मुक्तता.                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गोवंश तस्करी करणारे काही तस्कर हे गडचिरोली जिल्ह्रातील स्थानिक शेतक­यांकडून गोवंश जनावरे खरेदी करून त्यांना मालवाहु वाहनामध्ये अपु­या जागेत कोंबुन दाटीवाटीने व निदर्यतेने भरून कत्तली करीता दुरवरील शहरात विक्री करीता घेवुन जात असतात. अशा तस्करावर पायबंद घालण्यासाठी मा. पोेलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., यांचे आदेशाने मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी, प्राणहिता श्री. अनुज तारे सा., यांचे मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या घटनेतील नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी गोवंश जनावरांची तस्करी करणा­या 14 ट्रकमधील एकुण 403 गोवंश जनावरांची सुटका करण्यात यश मिळाले.
दि. 18/08/2022 रोजी पुराडा ते कुरखेडा मार्गे गोवंश तस्कर कत्तली करीता जनावरे 10 ते 12 ट्रकमध्ये कोंबुन नेत असल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कुरखेडा व पोस्टे कुरखेडा येथील पथकाने कुरखेडा जवळील गोठणगाव फाटा वन नाका येथे नाकाबंदी करून सापळा रचून कत्तलीसाठी वाहतुक करणारे 09 ट्रक पकडून 278 गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली.
तसेच दुस­या घटनेत दि. 19/08/2022 रोजीचे रात्रौ 01.00 वा. कत्तली करीता जनावरे ट्रकमध्ये कोंबुन बोटेझरी मार्गे येत असल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री. मयुर भुजबळ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार गट्टा (फु.) मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी कत्तलीसाठी वाहतुक करणारे 05 ट्रक फुलबोडी येथे पकडून एकुण 125 गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. सदर दोन्ही कारवाईमध्ये गोवंश वाहतुक करणा­यां 06 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई सुरू आहे. वरील दोन्ही घटनेत एकुण 14 ट्रक मुद्देमालासह जप्त करण्यात आले असून, एकुण 403 गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
सदर घटनेत कुरखेडा येथील कारवाई करीता उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर तसेच सपोनि दिनेश गावंडे, अंमलदार राकेश पालकृतीवार, नरेश अत्यालगडे, जितेंद्र कोवाची, मनोज राऊत, रूपेश काळबांधे व पेंढरी येथील कारवाई करीता उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री. मयुर भुजबळ, पोउपनि श्री. गजानन सोनुने, नापोशि/विलास कुमरे, नापोशि/संदीप बागळे, पोशि/नितेश कढव, पोशि/शरद जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleपिंपळगाव टोलनाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !
Next articleवनहक्काचे जंगल आले धोक्यात : वनसंवर्धन नियम २०२२ च्या विरोधात संघर्ष करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here