Home नाशिक पिंपळगाव टोलनाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

पिंपळगाव टोलनाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

141

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0010.jpg

पिंपळगाव टोलनाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

पिंपळगाव बसवंत- सागर कटाळे युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी                 सतत वादाच्या भोवऱ्यात असणारा पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा येथील कर्मचाऱ्यांमुळे चर्चेत आला आहे. नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे शासकीय वाहन टोलनाक्यावर अडवून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाटील यांना अरेरावी केल्याचे बोलले जात आहे.
अधिक माहिती अशी की, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील आपल्या शासकीय वाहनाने नाशिकडे जात असताना शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ७ च्या सुमारास टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांचे शासकीय वाहन अकारण अडवून ठेवत थेट अरेरावीची भाषा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तातडीने नाशिकड़े रवाना झाले. ही घटना पिंपळगाव पोलीस ठाण्यास समजताच त्यांनी टोल कर्मचान्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेत खडे बोल सुनावल्याचे कळते. या प्रकारानंतर पोलिसांकडून संबंधित टोल कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणी पाच टोल कर्मचाऱ्यांना पिंपळगाव बसवंत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यातील अरेरावी करणाऱ्या एका कर्मचान्यावर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.
पिंपळगाव टोलनाक्यावर यापूर्वीही तत्कालीन आमदार अनिल कदम यांचे वाहन अडविल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पोलीस अधीक्षकांचे शासकीय वाहन अडवून अरेरावीचा प्रकार घडल्याने पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Previous articleपूर परिस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांना खा.अशोकजी नेते यांच्याकडून अन्नधान्य किटचे वाटप
Next articleगोवंश कत्तलीसाठी नेणारे एकुण 14 ट्रक जप्त। गडचिरोली पोलीस दलास यश, दोन वेगवेगळ्या घटनेतील कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.