आशाताई बच्छाव
स्व.जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यार्थ भवानीपुर ता.मुलचेरा येथे भव्य फुटबॉल प्रतियोगिता..
बक्षीस वितरण समारोहच्या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भवानीपुर :- फुटबॉल प्रतियोगिता टूर्नामेंट मध्ये विजेत्या स्पर्धकांना व उपविजेता स्पर्धकांना खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.प्रथम बक्षीस- २०००१/- सुंदर नगरच्या विजेत्याने पटकाविला.द्वितीय बक्षीस-१५००१/- भवानीपुरच्या विजेत्याने पटकविला.
या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
त्यावेळी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रविंद्रजी औलालवार संघटन जि. महामंत्री,डॉ.रंजित मंडल,डे सर,थापकर सर,गाईनजी संजीव सरकार,संजय सरकार,संदिप बिशवास,विजय बिशवास,तसेच अनेक युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.