Home नाशिक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 जि. प. शाळा भौरी दहिवड येथे...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 जि. प. शाळा भौरी दहिवड येथे उत्साहात साजरा.

184

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0063.jpg

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 जि. प. शाळा भौरी दहिवड येथे उत्साहात साजरा.
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जि. प. प्राथ. शाळा भौरी (दहिवड) ता. देवळा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा. शाळेतील ध्वजारोहण जेष्ठ नागरिक श्री. शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी गाजत वाजत विविध घोषणांची आतिषबाजी केली. भारत माता की जय ,वंदे मातरम, इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
या निमित्ताने शाळेत नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, वेशभूषा, वकृत्व, चित्रकला ,रांगोळी, स्फूर्ती गीते, इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. आबाजी सोनवणे, उपाध्यक्ष श्री. योगेश सोनवणे, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी ताई, स्वयंपाकी, मदतनीस, पालक वर्ग, मुख्याध्यापक, व बालगोपाळ,उपस्थित होते. उपस्थितांना फलाहार व चॉकलेट वाटप करण्यात आले.
शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. पाटील मॅडम यांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना ध्वज विकत घेतले सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व परिश्रम घेतले, असून सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
विजयी स्पर्धक- निकिता सोनवणे, धनश्री सोनवणे, दिशा जाधव, डिंपल सोनवणे, देविदास सोनवणे, यश सोनवणे, प्रणव सोनवणे, ओम सोनवणे, उपस्थित मंडळींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Previous articleकोल्हापूरात तृतीयपंथीयाचा धिंगाणा,पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की कानाडोळा..?
Next articleकोद्री येथील नागरिकांचेआमरण उपोषण लेखी आश्वासना नंतर मागे! अखेर उपोषणामुळे जागे झाले प्रशासन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.