Home नांदेड तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामगुडा येथे आज घरोघरी तिरंगा चा अभिनव...

तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामगुडा येथे आज घरोघरी तिरंगा चा अभिनव शुभारंभ.

188

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0038.jpg

तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामगुडा येथे आज घरोघरी तिरंगा चा अभिनव शुभारंभ.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
चारी बाजूने डोंगर आणि जंगलाच्या सानिध्यात असलेले हे छोटे गाव व येथील आदिवासी बांधवांनी, महिलांनी आपले पारंपारिक गीत सादर करून अमृत महोत्सवी वर्षाला अभिवादन केले.

नागुबाई अर्जुन टेकाम यांच्या घरासमोर आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव, गटविकास अधिकारी सुभाष धनवे व गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.

ध्वजरोहणापूर्वी कोलामगुड्यातील ज्येष्ठ महिला नागुबाई अर्जुन टेकाम लक्ष्मीबाई रामा मडावी भीम बाई राजाराम मडावी नागुबाई लचु टेकाम, लक्ष्मीबाई रामा टेकाम रामबाई लेता मडावी, रामबाई लक्ष्मण आत्राम यांनी भाषेत स्वागत गीत गाऊन या अमृत महोत्सवी वर्षाला शुभेच्छा दिल्या.

Previous articleचंद्रपूर गडचिरोली महामार्गावर अपघात ;चार जण जागीच ठार
Next articleजिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित” फ्रीडम जाॅईन रॅली” लक्षवेधी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.