Home गडचिरोली खा.अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नांने अनेक रेल्वेचे प्रश्न मार्गी लागणार… रेल्वे...

खा.अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नांने अनेक रेल्वेचे प्रश्न मार्गी लागणार… रेल्वे नविन लाईनला मंजुरी.

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0040.jpg

खा.अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नांने अनेक रेल्वेचे प्रश्न मार्गी लागणार…

रेल्वे नविन लाईनला मंजुरी.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा-मंचेरियाल-आदिलाबाद आणि नागभीड-कांपा-टेम्पा चिमूर-वरोरा या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी…..

मान.श्री. अश्विनी वैष्णव, मंत्री, रेल्वे,दळणवळण, आणि माहिती भारत सरकार, नवी दिल्ली येथे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.

गडचिरोली चिमुर लोकसभेच्या क्षेत्रांतर्गत रेल्वे संदर्भात केंद्रशासनाला सतत केलेल्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने रेल्वेचे प्रश्न मार्गी लावणारे एकमेव खा.अशोकजी नेते
यांचा लोकसभा मतदारसंघ हा गडचिरोली-चिमूर हा अनेकशे कि.मी. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठा आदिवासी संसदीय मतदारसंघ आहे. हा भाग अत्यंत मागासलेला आणि आदिवासी बहुल नक्षलग्रस्त दुर्गम आणि अविकसित क्षेत्र आहे.
खासदार साहेबाच्या पाठपुराव्याने व केलेल्या प्रयत्नाने रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याने गडचिरोली-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा-मंचेरियाल-आदिलाबाद आणि नागभीड-कंपा-टेम्पा चिमूर-वरोरा या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आजतागायत यासाठी निधी देण्यात आलेला नाही.त्यामुळे सदर नव्याने मंजूर झालेल्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे.नागपूर उमरेड – नागभीड या ब्रॉडगेजच्या बांधकामाच्या कामात कानपा- चिमूर – वरोरा या ब्रॉडगेजच्या बांधकामाचा समावेश करून निधीचे वाटप माझ्या लोकसभा मतदारसंघातील चिमूर, जिल्हा चंद्रपूर परिसर हा स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने 1942 मध्ये सुरू झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांना जर्मनीच्या बर्लिन रेडिओवरून त्यांनी स्वतंत्र घोषित केले होते. मात्र या ऐतिहासिक स्थळाचा विकास अद्यापही रखडला आहे. औद्योगिक चंद्रपूर जिल्ह्यातील कानपा-चिमूर-वरोरा ब्रॉडगेजच्या बांधकामामुळे विकासाला चालना मिळणार आहे.
या भागातील ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.त्यामुळे प्रगतीपथावरील रेल्वे नागपूर-उमरेड-नागभीड ब्रॉडगेजच्या कामाबरोबरच कानपा-चिमूर-वरोरा या नवीन ब्रॉडगेजचा समावेश करून निधीचे वाटप करावे याकरीता मा.श्री.अश्विनी वैष्णव मंत्री, रेल्वे, दळणवळण आणि माहिती भारत सरकार नवी दिल्ली येथे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभेच्या क्षेत्रांतर्गत नेहमी रेल्वे संदर्भात केंद्र शासनाला सतत केलेल्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने अनेक प्रश्न मार्गी लावणारे एकमेव खासदार अशोकजी नेते.

Previous article,!!तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे चीचडोह ब्यारेज येथे गेलेल्या शेतीचे पैसे मिळतील काय ?- !!आशीष भाऊ पिपरे नगरसेवक भाजपा न,प, चामोर्शी!!
Next articleदापोलीतील ताडील येथील दत्तमंदिराचा जीर्णोद्धार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here