Home रत्नागिरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठीचे “हेरिटेज वॉक” ठरले लक्षवेधक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठीचे “हेरिटेज वॉक” ठरले लक्षवेधक

132

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0028.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठीचे “हेरिटेज वॉक” ठरले लक्षवेधक                                                  रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. याच्या जनजागृतीसाठी आज पोलीस कवायत मैदान ते टिळक स्मारक दरम्यान हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले होते.

लक्षवेधक वेशभूषेसह या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वॉकमध्ये जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव यांच्यासह जिल्हा परिषद तसेच पोलीस दल आणि महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय तसेच पटवर्धन हायस्कूल इतरही शाळांच्या मुलामुलींचा सहभाग या वॉकमध्ये होतो. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासह विविध वेशभूषेत विद्यार्थी यात सहभागी झाले होते. शहरातील मार्गावरुन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान असलेल्या टिळक स्मारक येथे समारोप झाला.

Previous articleमंत्री लोढा आणि राज ठाकरें भेटीने तर्कवितर्क
Next articleजीवन गाण्यातील संवेदना जेंव्हा कारागृहातील कैदी जपण्यासाठी कटिबद्ध होतात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.