Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

148

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0023.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

राष्ट्रीय स्तरावरचा अण्णा साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पर्व, दिल्ली लोकशाहीर जनकल्याण समिती, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई हरीश कांबळे यांना राष्ट्रीय स्तरावरचा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री विनय सहस्रबुदधे, डॉ. शिवलिग शिवाचार्य महाराज, अशोक मेंढे, माजी आमदार राम गुंडीले, संयोजन समितीचे मुख्य सचिव विक्रम सोळसे, अध्यक्ष विशवनाथ सदामते, शारदा डोलारे, दिलीप सोळसे, केशव सरवदे, मधुकर सोनवणे, कमलेश गायकवाड अविनाश महातेकर आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleयिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.