आशाताई बच्छाव
मराठी अस्मितेचा घोर अपमान सर्व राजकीय पक्ष्यांकडून कोश्यारीं यांच्यावर टीकास्त्र
युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी :– रवि शिरस्कार संग्रामपूर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मराठी माणसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. शनिवार, ३०/०७/२०२२, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी काढले की गुजराती आणि मारवाडी वगळले तर मुंबईकडे काही शिल्लक राहणार नाही अशा भाषेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंबईमध्ये गुजराती आणि मारवाडी नसतील तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही या त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांकडून घाणगाती टीका होऊ लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक आहे असे सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही असे सांगितले.
त्यामध्ये राज ठाकरेंनी इतिहास माहिती नसेल तर बोलू नका, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यामध्ये आंदोलन सुरू झाले .उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ येऊ नये असा सल्ला दिला. महाराष्ट्र मध्ये हिंदू मध्ये फूट पाडू नका अशा प्रकारचे वक्तव्य या ठिकाणी होऊ लागले. महाराष्ट्र व मुंबई हे मराठी माणसांच्या रक्तामुळे उभी आहे असेही सांगण्यात ते विसरले नाही. मराठी माणसांचे बलिदान व मराठी माणसांचं योगदान हे मुंबई व महाराष्ट्र यांच्यासाठी खूप मोलाचे आहे हे राज्याचे राज्यपाल यांनी विसरता कामा नये. मुंबईमध्ये सर्व जमीन ह्या मराठी माणसांच्या आहेत व त्यावर उभे राहिलेले उद्योगधंदे यामुळे उभारी घेऊ लागलेली ही आर्थिक राजधानी बनली आहे. चौफेर टीका होत आहे असे लक्षात आल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्य चा विपर्यास केला जात आहे असे सांगितले. त्यानंतर आपण मराठी माणसांबद्दल काही वाईट बोललोच नाही असे म्हणून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.तर् कोश्यारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात यावी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.