Home गडचिरोली दिनांक २६ जुलैला व्याहाड (खुर्द) येथे सावंगी मेघे व रोल संस्था वतीने...

दिनांक २६ जुलैला व्याहाड (खुर्द) येथे सावंगी मेघे व रोल संस्था वतीने सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

107

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0036.jpg

दिनांक २६ जुलैला व्याहाड (खुर्द) येथे सावंगी मेघे व रोल संस्था वतीने सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड (खुर्द) तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे सकाळी ९ वाजता पासून दू. २ वाजेपर्यंत करण्यात येणार रुग्णांची नोंदणी

या मोफत उपचार शिबिराचा लाभ घ्यावा आयोजकांचे आवाहन

 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे )व द रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिविंग इन्हान्समेंट अहेरी (रोल) च्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड (खुर्द) येथे दिनांक २६ जुलै २०२२ रोजी करण्यात आले असून रुग्णालयाच्या खर्चात सवलत देणारे हे शिबिर असल्याने या शिबिराचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

या शिबिराचे आयोजन डॉक्टर अभ्युदय मेघे विशेष कार्यकारी अधिकारी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, डॉक्टर धीरज पटेल अध्यक्ष रोल संस्था अहेरी ,डॉक्टर सुरेशजी डोळे सचिव रोल संस्था अहेरी तसेच डॉक्टर अमित बाटवे, स्वामी विवेकानंद चल चिकित्सालय संचालक व्याहाड यांनी केले असून ग्रामीण परिसरातील रुग्णांना पुढील उपचारासाठी या शिबिराचा लाभ मिळावा या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला येणाऱ्या रुग्णांची नोंद सकाळी ९ ते दुपारी २ वाजता पर्यंत करण्यात येणार असून शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रोगांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराला विविध वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार असून त्यांच्या तपासणीच्या आधारावर पुढील उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात पाठवून विविध शासकिय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Previous articleपत्रकाराची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा
Next articleमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून भिमरगुडा येते किट वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.