Home अमरावती कृषी विद्यार्थ्यांनी नांदगाव पेठ गावामध्ये “कृषिदिन” केला साजरा

कृषी विद्यार्थ्यांनी नांदगाव पेठ गावामध्ये “कृषिदिन” केला साजरा

125

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0031.jpg

कृषी विद्यार्थ्यांनी नांदगाव पेठ गावामध्ये “कृषिदिन” केला साजरा

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

अमरावती:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय , अमरावती द्वारा संचालित ‘ ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ‘ सन २०२२ -२३ या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदुत म्हणून पूर्वेश गायकवाड व योगेश निखाडे रा. नांदगाव पेठ ता.जि. अमरावती येथे ‘यांनी कृषिदीन ‘ साजरा केला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रामध्ये १ जुलै हा दिवस कृषीदिन म्हणून शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येत असतो . कृषी दिनाच्या निमित्त कृषीदुतांनी गावामध्ये जिल्हा परिषद महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पेठ येथील शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीने गावामध्ये प्रभातफेरी काढली व वृक्षारोपण केले.या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ठाकरे सर, प्राचार्य सौ.शिरभाते व श्री.सातपुते सर व इतर शिक्षकवुंद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. वैभव लाजुरकर सर , उपप्राचार्य नितेश चौधरी सर , कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल कऴसकर सर , तसेच प्रा. उदय देशमुख सर , प्रा. हेमंत पवार सर , प्रा. श्वेता देशमुख मॅडम , प्रा. डॉ. अर्चना त्रिपाठी मॅडम , प्रा. अर्चना बेलसरे मॅडम , प्रा. श्रद्धा देशमुख मॅडम , प्रा. श्वेता गणवीर मॅडम व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमाला गावातील सरपंच , उपसरपंच व पोलिस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.
पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ॲंड वेलफेअर ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री. प्रवीणभाऊ पोटे पाटील व कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. टी. इंगोले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleपीक कर्ज वितरणाची गती वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा-   निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते
Next articleपळशी सुपो येथे कृषी सप्ताह अंतर्गत कृषी मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.