Home नांदेड शेतकरी व लाभार्थ्यांना त्रास न होऊ देता कर्मचाऱ्यांनी समन्वयाने बँकेचे हित जोपासावे...

शेतकरी व लाभार्थ्यांना त्रास न होऊ देता कर्मचाऱ्यांनी समन्वयाने बँकेचे हित जोपासावे – माजी आ. हणमंतराव पा बेटमोगरेकर

136

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0014.jpg

शेतकरी व लाभार्थ्यांना त्रास न होऊ देता कर्मचाऱ्यांनी समन्वयाने बँकेचे हित जोपासावे
– माजी आ. हणमंतराव पा बेटमोगरेकर

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड -अनेक अडचणीतून प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहु पण यापुढे शेतकरी सभासद लाभार्थ्यांना त्रास न होऊ देता समन्वयाने जिल्हा बँकेचे हित जोपासावे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे मुखेड तालुक्यातील गटसचिव, तपासणी अधिकारी आदींची बेटमोगरा येथे आज (दि.18) संचालक मा.आ.बेटमोगरेकर यांचे अध्यक्षतेत कर्जवसुली व वाटप आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की प्रत्येक कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीत तुमच्या मागे मी भावासारखा ठाम राहीन पण शेतकरी, सभासद व लाभार्थी यांना त्रास किंवा गैरसोय सहन करणार नाही.सर्वाना सहकार्य व सन्मान देऊन समन्वयाने बँक फायद्यात आणा. यावेळी मुख्य तपासणी अधिकारी रावणगावकर यांनी तपशीलवार माहिती व आढावा घेतला तर याप्रसंगी प्रमुख उपस्थित काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, खुशाल पाटील सावळे, चेरमन दत्ता माली पाटील, सरपंच नयूम दफेदार, बालाजी पोदार, आदींसह सर्व गटसचिव व तपासणी अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

Previous articleश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प त्वरीत हटवा, अन्यथा मी स्वतः – खासदार श्रीरंग बारणे
Next articleउपप्राचार्य पदी प्रा.साहेबराव बळवंते यांनी रूजू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.