Home नाशिक धक्कादायक-कोटबेलला अवघा चौदा वर्षाचा मुलगा ट्रँक्टरसह विहीरीत कोसळून जागीच ठार;सर्वत्र हळहळ!

धक्कादायक-कोटबेलला अवघा चौदा वर्षाचा मुलगा ट्रँक्टरसह विहीरीत कोसळून जागीच ठार;सर्वत्र हळहळ!

129

आशाताई बच्छाव

Screenshot_20220620-093708_WhatsApp.jpg

धक्कादायक-कोटबेलला अवघा चौदा वर्षाचा मुलगा ट्रँक्टरसह विहीरीत कोसळून जागीच ठार;सर्वत्र हळहळ!
(गोपीनाथ भोये प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुल्हेर-सटाणा तालुक्यातल्या कोटबेल गावात अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत असून,त्यामुळे सगळ्या गावावर शोककळा पसरली असून,सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत प्राप्त अशी की,परवा शनिवार दि.१८ जुन रोजी कोटबेल या गावात खताने भरलेला ट्रँक्टर रिव्हर्स घेत असताना अवघा चौदा वर्षाचा असलेला अविनाश योगेश खैरनार हा बालक ट्रँक्टरच्या ट्राँलीसह विहीरीत कोसळल्याने जागीच मृत्युमुखी पडला.या घटनेनंतर कोटबेल गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.