Home नांदेड बरबडा जिल्हा परिषद शाळेत शाळा पुर्व तयारी प्रभात फेरी दिला शिक्षणाचा शुभ...

बरबडा जिल्हा परिषद शाळेत शाळा पुर्व तयारी प्रभात फेरी दिला शिक्षणाचा शुभ संदेश.

109

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0021.jpg

बरबडा जिल्हा परिषद शाळेत शाळा पुर्व तयारी प्रभात फेरी दिला शिक्षणाचा शुभ संदेश.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकासह विध्यार्थीनी दिनांक १५ जुन २०२२ रोजी शाळेतील विद्यार्थी व विध्यार्थीनी गावातून प्रभात फेरी काढून शासनाना एक सुंदर असा संदेश पाठवला तर गावातील विध्यार्थीना शिक्षणाची गोडी आवड निर्माण झाली पाहिजे या हेतूने शाळेत येण्यासाठी घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली त्याच बरोबर साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा आपल्या मुला मुलींना शाळेत पाठवा यासह अनेक नारे देत गावातील मुख्य रस्त्याने प्रभात फेरी बँड बाज्याच्या तालात काढण्यात आली असल्याने सदरची प्रभात फेरी गावांत आकर्षक ठरली आहे

शाळेच्या गेट जवळ येताचा जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती चे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे, किरण हनमंते, माधव माचनवाड, केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, मुख्याध्यापक साहेब गुंटे, कंधारे, दिलिप जेटेवाड, प्रकाश कुंभरगावे, गोविंद मार्गेपवार, शिवदास कुंभरगावे, शेवाळे, दत्ता अंबुलगे, आलूरे, राजश्री भैराट, मुखेडकर मॅडम, अंगणवाडी शिक्षिका, या सर्वांच्या हस्ते मुलांना पुष्प देऊन स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

Previous articleहिंगणगाव ता. हातकणंगले हिंगणगाव येथील बौध्द समाजामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.
Next articleकावळगाव येथे जि.प.शाळेच्या वतीने प्रवेश उत्सव दिन साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.