Home गडचिरोली धान खरेदी केंद्राची उत्पादक मर्यादा व शेतकऱ्यांची उद्दिष्ट वाढवुन देण्यात खा.अशोकजी नेते...

धान खरेदी केंद्राची उत्पादक मर्यादा व शेतकऱ्यांची उद्दिष्ट वाढवुन देण्यात खा.अशोकजी नेते यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश…….. खा.अशोकजी नेते

130

आशाताई बच्छाव

IMG-20220603-WA0027.jpg

धान खरेदी केंद्राची उत्पादक मर्यादा व शेतकऱ्यांची उद्दिष्ट वाढवुन देण्यात खा.अशोकजी नेते यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश……..
खा.अशोकजी नेते                                             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली.चंद्रपूर.भंडारा,गोदिया हेजिल्हे भात उत्पादक म्हणून ओळखले जाते.शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असते.यावर्षी खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने सदर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.उपलब्ध असणारे पाण्याचे साधन वापरून त्यांनी उन्हाळी हंगामामध्ये धानाची लागवड केली आहे.त्यानुसार उन्हाळी हंगामामध्ये धानाचे उत्पादन लक्षणीय होण्याची शक्यता आहे.हे धान विकुन खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल अशी आशा या शेतकऱ्यांना आहे.परंतु यावर्षिचे मार्केटिंग फेडरेशन द्वारे निश्चित करण्यात आलेले धान खरेदीचे उद्दिष्ट अत्यल्प आहे.त्यामुळे सदर धान उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मार्केटिंग फेडरेशन च्या माध्यमातून उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी खा.अशोकजी नेते यांनी केंद्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांचे धान उत्पादन वाढून सुद्धा राज्यसरकार‍ दरवर्षी जेवढे ऐकरी उत्पादन होते. तेवढिच मर्यादा दिल्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढून धान्य कुठे विकले जावे.या चिंतेत शेतकरी असून त्यासाठी शेतकऱ्याचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी मागणी केली होती. उन्हाडी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्‍ट वाढविण्‍यास केंद्रशासन शेतकऱ्यांच्या हिताचे नेहमी निर्णय घेऊन काम करीत आहे.त्यानुसार मागीलवर्षी राज्यशासन धान्य खरेदी 1.85 लाख टन एवढी होती. पण खा.अशोकजी नेते यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नाला यश येऊन राज्य सरकारला 2.75 लाख टन मर्यादा वाढवून दिल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल

Previous articleगोंडवाना विद्यापीठास आदिवासी व वन विद्यापीठाचा दर्जा द्या: आ.सुधीर मुनगंटीवार
Next articleप्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान व रोगनिदान शिबिराचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.