Home गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालय तत्काल चालू करा. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची वैद्यकीय...

वैद्यकीय महाविद्यालय तत्काल चालू करा. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या कडे मागणी.

138

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0040.jpg

वैद्यकीय महाविद्यालय तत्काल चालू करा.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या कडे मागणी.

गडचिरोली/सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क/ गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील अतिशय मागास व दुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे जिल्ह्यात दळणवळण व इतर सोयीसुविधा सुद्धा कमी आहे. अश्या परिस्थितीत जिल्ह्याला एक नवी ओळख देण्याकरितात व जिल्ह्यातील युवकांचा वैद्यकीय शिक्षणातील दर्जा उंचावण्याकरिता जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणे अत्यन्त गरजेचे आहे. परंतु प्रसार माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय रद्द करून त्या जागी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार असल्याचे सांगितल्या जात आहे. जिल्ह्यात उत्तम आरोग्यसुविधा मिळण्याकरिता सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणे काळाची गरज आहे परंतू त्या आधी सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज असल्याने तत्काळ वैद्यकीय महाविद्यालच जिल्ह्यात सुरु करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी सोबत युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे सुद्धा उपस्थित होते.

Previous articleक्रुरतेचा कळस : निर्दयी आईने पोटच्या २ चिमुल्या लेकरांची हत्त्या करुन शव जाळले
Next articleबेरोजगारांना उद्योजकाचे स्वप्न साकारण्यासाठी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षणातून दिशा – महापौर जयश्री पावडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.