Home नांदेड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना 2 जून रोजी होणार...

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना 2 जून रोजी होणार प्रसिद्ध

125

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0045.jpg

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना 2 जून रोजी होणार प्रसिद्ध
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड,:- नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना दिनांक 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या आदेशाच्या मसुद्याची प्रत ही जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव खै, लोहा, कंधार, मुखेड, व देगलूर येथील तहसिलदार कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे फलकावर प्रसिद्ध केले जात आहे. आदेशाच्या मसुदास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्या संदर्भात सकारण लेखी निवेदने/ हरकती/ सूचना तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे 8 जून 2022 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेली निवेदने/हरकती/सूचना आदी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

Previous articleजिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयांना अत्याधुनिक रोव्हर्सचे वाटप
Next articleजिल्ह्यातील पीक कर्ज वाटप मोहिमेला अभूतपूर्व यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.