Home गडचिरोली काँग्रेसचे शिर्डी येथे 2 दिवशीय नवसंकल्प कार्यशाळा। जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ही राहणार...

काँग्रेसचे शिर्डी येथे 2 दिवशीय नवसंकल्प कार्यशाळा। जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ही राहणार उपस्थित.

106

आशाताई बच्छाव

IMG-20220530-WA0026.jpg

काँग्रेसचे शिर्डी येथे 2 दिवशीय नवसंकल्प कार्यशाळा।

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ही राहणार उपस्थित.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// अखील भारतीय काँग्रेस कमिटीच्या, उदयपूर नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने 1 व 2 जून 2022 रोजी शिर्डी येथे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच.के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली “नवसंकल्प कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे सर्व काँग्रेसचे मंत्री, आमदार ,प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्याचे जिल्हाध्यक्ष, आदी उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे सह जिल्ह्यातील सर्व नेते,प्रदेश पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहे.
या नवसंकल्प शिबिरात संघटन गट, राजकीय गट, आर्थिक गट, शेतकरी आणि शेतमजूर गट, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण गट सोबतच युवक आणि महिला सक्षमीकरण गट असे विविध समित्या तयार करण्यात आल्या असून त्या माध्यमातून काँग्रेस ला अधिक मजबूत करण्या करिता प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची युवक आणि महिला सक्षमीकरण समिती मध्ये निवड झाली असून, युवक आणि महिला सक्षमीकरनाच्या संदर्भाने पक्षाचे ध्येय अधिक मजबूत करण्या करता, अधिकाधिक युवकांना पक्षात संधी देन्या करिता, सोबतच रोजगार निर्मिती च्या संदर्भाने ही युवकांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय हा विषय या समिती समोर मांडणार व युवक आणि महिलांच्या सक्षमीकरना करिता पूर्ण प्रयत्न करणार असे महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.

Previous article२९२ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीला मृगाचा मुहूर्त! ६ जूनला निघणार ‘लॉटरी’ !!
Next articleप्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांना (लाभार्थी) परिसंवाद कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.