Home नांदेड उंद्री प.दे. ता.मुखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती...

उंद्री प.दे. ता.मुखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती उत्साहात साजरी.

135

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0025.jpg

उंद्री प.दे. ता.मुखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती उत्साहात साजरी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज उंद्री प.दे. ता. मुखेड नगरीत कर्तव्यनिष्ठ, धाडसी, महापराक्रमी, न्यायनीती धुरंधर, सर्वगुणसंपन्न पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंतीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. महापराक्रमी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा. प्रजाहित दक्ष, आदर्श राज्यकर्ती म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी सुधाकर गुरुजी गनलेवार, राजू पाटील सूर्यवंशी, आकाश पाटील वडजे,राजू वाघमारे, दयानंद सोनकांबळे, उमेश सोनकांबळे, हनमंत शिरगिरे, मारोती शिरगिरे, केरबा पंदनवाड, तुकाराम कलुरे, संदीप शिरगिरे सह समाज बांधव ,गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभेसळ खत व बियाणे तयार करणाऱ्या कंपनीची चौकशी करून कारवाई करा शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची मागणी
Next articleस्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.