Home नाशिक बागलाण तालुक्यातील आंतरजातीय अल्पवयीन आदिवासी मुलींचे विवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे तक्रार…!

बागलाण तालुक्यातील आंतरजातीय अल्पवयीन आदिवासी मुलींचे विवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे तक्रार…!

111

राजेंद्र पाटील राऊत

बागलाण तालुक्यातील आंतरजातीय अल्पवयीन आदिवासी मुलींचे विवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे तक्रार…!

सटाणा(दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):-आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेच्या शिष्टमंडळाने आज बागलाण तालुक्याचे माजी आमदार मा.संजय चव्हाण यांची भेट घेऊन बागलाण तालुक्यातील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींच्या आंतरजातीय विवाहांना आळा घालण्यात यावा.तसेच यासंदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार मा.सौ.दिपीकाताई चव्हाण यांच्यासमवेत बागलाणचे तहसीलदार साहेब तसेच गटविकास अधिकाऱ्यांसोबत येत्या सोमवारी संस्थेच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे मा.चव्हाण साहेबांकडून आश्वासन देण्यात आले.तसेच यावेळी तालुक्यातील आदिवासी महिलांवरील गावागावात होत असलेल्या अत्याचार व विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रविण पवार सर सोमपूर, उपाध्यक्ष मा.कैलास मोरे सर, सचिव मा.मश्चिंद्र बोरसे सर, प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार, वंकर सोनवणे,सचिन सोनवणे,रवींद्र शिंगरे,हिरालाल गायकवाड, दत्तात्रय सोनवणे,बापु वाघ,राजु वाघ,कृष्णा पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleराणा दाम्पत्याची तुरुंगवारी कायम…! हनुमानाने ही साथ सोडली..?
Next articleताकबिड येथे दशवार्षिक कृतीनियोजन आराखडा कार्यक्रम संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.